कधि मी जातो त्या रस्त्यावर
भेटलो जेथे दोघे आपण
नव्हती जरि ती पहिली भेट
पहिलिच पण ती होती वेळ
ठाऊक होतिस मजला तू अन
तूही मजला होतिस जाणुन
ओळख नव्हती झालेली अन
भासे गेला फुकटच काळ
विश्वाच्या या चार मितींत
अजब आगळा चाले खेळ
आला क्षण ना येई फिरोन
बदले पण तो अवघे जीवन
त्या भेटीतच सुर ते जुळले
मैत्रीचे हे गोफ गुंफले
अनोळखी ती वाटच वेडी
पावलांखाली अलगद सरके
साथ तुझी ही घेऊन आली
मजला कुठल्या वळणावरती
हवेहवेसे दिसे समोरी
हासे रस्ता मुग्ध आनंदी
No comments:
Post a Comment