कसे घडले कुणास ठाऊक, रात्र संपुनी पहाट झाली,
आज एक पूर्ण दिवस, तिची आठवण आलीच नाही!
किती रात्री झुरलो होतो, तिने कधी हसून बघता,
किती दिवस जगलो होतो, कधी तिच्याबरोबर फिरता,
पण कधीच कळल्या नाहीत, भावना मनातल्या एकमेकांच्या,
चाललो जरी एकत्र आम्ही, कायम आमच्यात राहिली दुरी,
-आज एक पूर्ण दिवस, तिची आठवण आलीच नाही...
सरल्या सगळ्या वेळा रम्य, जेव्हा दिलेला गुलाब बहर,
सरल्या सगळ्या नागमोडी वाटा, आठवणींच्या पुसल्या खुणा,
रस्ते नवीन शोधात गेलो, गंतव्य दोघांचे वेगळे होते,
फुले सगळी कोमेजून गेली, उरली रानवेलींची दाटी,
-आज एक पूर्ण दिवस तिची आठवण आलीच नाही!
तरी झाला त्रास मनाला, निसटलेल्या त्या क्षणांचा,
असते सगळे वेगळे का, केला असता धीर जरा?
भंडावणार्या या प्रश्नांना, उत्तर कधी सापडले ना,
काळाबरोबर वहात जाउनी, प्रश्नचिन्हेच पुसटत गेली,
-आज एक पूर्ण दिवस, तिची आठवण आलीच नाही!
No comments:
Post a Comment