पाऊस नाही म्हणून पाण्यासाठी, या जमिनीत खणल्या विहिरी,
अनेक काळ खोल जिरवलेले, पुरवून वापरतोय पाणी,
उपसा करतोय खोल खणत, थेंबही नाही घालवत वाया,
पाऊस नसला आता तरिही, आणत नाही डोळा पाणी.
तूही गेलीस दूर तेव्हा, रुक्ष झाले जीवन माझे,
दोन पावसाळ्यातील क्षण जसे, असेच तेव्हा होते जगणे,
बघत वाट तुझ्या येण्याची, तिष्ठत बसलो रस्त्याकाठी,
तू येताची दूर पळाली, काकड-थंडी, उष्ण तल्लखी.
आलीस बरसत मृगनक्षत्री, चिंब-चिंबशी करीत ही अवनी,
श्रावण-सोज्वळ इंद्रधनुष्यसी, हासत हस्ती हात देऊनी,
आठवणींच्या भरत तू विहिरी, फुले कोवळी करीत सुगंधी,
ओले करित मम मन उन्मनी, संधिप्रकाशी वीज तेजस्वी,
गेलीस निघुनी तू एक क्षणी, हरित-खुळे मन इथे सोडूनी,
मोट लावली स्वतःस जुंपुनी, काव्यबीजांस घालत पाणी,
शेते फुलून झाली पिवळी, फुले उमलती मम कवितांची,
कृतज्ञतेस्तव तुजप्रती हे, एक पुष्प तव चरणांशी.
mast ahe kavita....
ReplyDeletekya baat hai..
ReplyDelete