प्रियकर-
मित्रा, मजसाठी एक लिहिशील कविता?
त्या माझ्या परीसाठी,
मनोहर तिच्या सौंदर्यासाठी,
हसवत तिला मोहारवणारी,
एक कविता मला लिहून देशील?
नेऊन देईन मी तिला,
खुलवीन तिची कळी पुन्हा,
जाऊ जोडीने मनीच्या देश,
दे ना रे एक कविता मला!
कवी-
छ्या सारखे आपले तेच तुझे,
कविता दे ना, चारोळी दे ना,
दररोज येऊन खातोस डोके,
म्हणे एखादी कविता दे ना!
नाही देत जा कविता तुला ,
आहेत चांगले विषय जगात,
तुझे तूच लिही जरा,
बर वाटेल तुझेच तुला!
प्रियकर-
अरे आता हा का त्रास झाला?
तूच भेटवलस ना तिला मला
नसतास तू अन तुझी कविता,
आलो असतो का मी जन्मा?
तिच्यावर तू केलीस कविता
आठवतात ना प्रसूतिवेदना
तेव्हाच झाला जन्म माझा
मग आता का चिडतोस असा?
कवी -
खरे बोलतोस रे तू मित्रा,
माझ्यामुळेच हि घडतेय कथा
थांब रचतो काही आत्ता
एक अट फक्त ऐक जरा
भेटून आल्यावर तू तिला
सांगशील सगळे खरे मला
- बघू नकोस अरे असा-
कवीला फक्त एक विषय हवा!
No comments:
Post a Comment