Welcome, friend...

Welcome to my Blog... As the name suggests, here are the records of my time as a sail the sea of dreams... Enjoy!!!

Monday, October 12, 2009

वेड

मला वेड लागलंय...!

त्या काळ्याभोर केसांचं,
त्या निखळ हास्याचं,
त्या बोलक्या डोळ्यांचं,
आणि,
त्या नकट्या नाकावरच्या
लटक्या रागाचं,
मला वेड लागलंय...!

त्या झंकारत्या आवाजाचं,
त्या स्वर्गीय सुगंधाचं,
त्या मोहक चालीचं,
आणि,
क्षणभरात जन्माचा गांगरवणाऱ्या
त्या नजरेचं,
मला वेड लागलंय...!

त्या रात्रीच्या झुरण्याचं,
त्या दिवसैल स्वप्नांचं,
त्या अनामिक हुरहुरीचं,
आणि,
दवासारख्या आणि तितक्याच टिकणाऱ्या
त्या रुसव्याचं,
मला वेड लागलंय...!

तिच्या रम्य आठवणींचं,
त्या वहीत ठेवलेल्या पिसाचं,
हातात धरलेल्या उबदार हाताचं,
आणि,
कितीही असावा वाटला तरी,
तिच्या या अजिबात नसण्याचं,
मला वेड लागलंय...!

तू

क्षितिजाच्या हि पार तू
उंच उंच गगनात तू
तुडविता मी उष्ण वाळू
लाटांत तू, मृगजळात तू

भासती मज स्वप्न अता
तुजसवेचे ते क्षण
पण जर ते स्वप्न सर्व
फुले फुललेली का हळू?

वाट आहे तिथं अजून
वृक्ष ही ते तसेच
पक्षी साद देती अविरत
नसे उत्तर द्याया तू

ऋतु अजूनही बदलतात
नेमेची येई पाऊस
कितीही भिजलो मी जरी
कोरडा जणू काय वाळू

नवल

अजि काय सांगू नवल तुम्हाला
देवकृपा जाहली म्हणा ना
आजवर स्वप्नातली ती
समोर आली अप्सरा

निळ्या निळ्या डोळ्यांत तिचिया
मी हरवून बसलो मम मना
कृष्ण-कुन्तलांचे पाश सुंदर
अडकण्याचीच आता इच्छा

घाटदार तिचा बांधा
सुगंध दरवळे अमृताचा
धोक्याच्या वळणावर कुणी
घसरावा अगदी सरळ वळणाचा

मी काढून घेता हळूच चिमटा
खुदकन हसली अशी कि, अहाहा!
अन मग मात्र मी मनातच म्हटले
वेन्धळा रे तू वेन्धळा!

ती मात्र होती खूपच हुशार
स्वर्गातलीच ती परी न का
ऐकता नुसते 'त त प प' वदली,
'त्या तिथली पाणी-पुरी? चला'

जेथे जाऊ ते ते सर्व
दिसत होते सुंदर मजला
सौंदर्य कोशात गुरफटलेल्या मला काय?
जरी कुणा वाटला हेवा

अन मग ती म्हणे बाला
मला फार आवडलात तुम्ही बरं का
ऐकून हे, हृदय फुलता, वदे
कधी उडवायचा बार लग्नाचा?

कानी माझ्या हे शब्द पडता
जीव मुठीत घेऊन केल्या सुंबाल्या
अस्सा गडगडाट झाला कि जणू
देवाने कपाळी हात मारून घेतला!!!