ती म्हणजे,
घामाघूम अंगावर शिरशिरी आणणारा गार वारा...
ती म्हणजे,
थंडीने काकडणाऱ्या जीवासाठी स्वेटर नवा...
ती म्हणजे,
नुसत्याच पोकळ काठ्या झालेल्या झाडावरचं चाफ्याचं फूल...
ती म्हणजे,
अंधारलेल्या घरात येणारं सकाळचं कोवळं ऊन...
ती म्हणजे,
रानात पक्क्या पिकलेल्या फणसाचा गोड गंध...
ती म्हणजे,
झाडाचं सर्वांग आच्छादून टाकणारा गुलमोहोरी रंग...
ती म्हणजे,
जखमेवरती मायेची हळुवार फुंकर...
ती म्हणजे,
निजलेल्या बाळावरची रंगीत मऊ चादर...
ती म्हणजे,
ताप आल्यावर कपाळावरची थंडगार घडी...
ती म्हणजे,
चुकल्यावरती हातावर बसणारी उभी पट्टी...
ती म्हणजे,
आसमंत भारणारे मंजुळ कूजन पक्ष्यांचे...
ती म्हणजे,
माझे सर्वस्व व्यापुनी उरते दशांगुळे...
No comments:
Post a Comment