सांग मला तू, कविता तुजला, लिहिणे ऐश्या जमे कसे?
शब्द तर मजला देखील ठाउक, अर्थवाहि त्या रचसि कसे?
शब्दांमधुनी अर्थ नवनवे, सांग मला शोधिसी कसे?
माहित मजला चित्र असे त्या, रंग नविन तू देसि कसे?
अर्थवाहि ना करितो मी त्या, येती तेच ते अर्थ घेउनी,
बीज रोपले कुणी तयासी, धुमारे जैसे फुटताती,
रंग मि कुठला भरणारे, मज काय असे तू म्हटलेस,
जगन्नियत्याच्या कुंचल्यातला मी, एखादा छोटा केस...
No comments:
Post a Comment